Wednesday 25 September 2013

" भ्रष्टाचार "

आधुनिक युगात प्रत्येक व्यक्तीचे जीवन " स्वार्थ " या एकाच गोष्टी पर्यंत सीमित झाली आहे. समाजात सर्वत्र
" स्वार्थ " हि प्रमुख अंग किवा मुलभूत गरज बनली आहे. समाजात अनैतिकता, अराजकता, आणि स्वार्थ युक्त  भावनांचा बोलबाला झाला आहे. परिणामी भारतीय संस्कृती आणि त्याचे पावित्र्य नष्ट होत चालले आहे. या सर्वाना जबाबदार एकाच गोष्ट ती म्हणजे
 " भ्रष्टाचार "

प्रत्येक सामान्य माणूस किवा श्रीमंत माणूस नेत्या पासून साध्या शिपाया पर्यंत प्रत्येक व्यक्तीला पैश्याची ची हाव झाली आहे. पैसा हेच सर्वकाही होवून बसले आहे. त्यामुळे श्रीमंत आणखीन श्रीमंत आणि गरीब आणखीन गरीब होत चालले आहे. राजकारणी ज्यांना आपण नगरसेवक, आमदार , खासदार नंतर मंत्रिमंडळात नेवून पोचवतो या अपेक्षेने कि ते समाजात काही बदल घडवून आणतील आणि या देशाला महासत्ता असलेला देश बनवतील पण हेच राजकारणी हातात सत्ता आल्या नंतर मला कुठे पैसा मिळतोय याचाच अर्थ स्वताचा आधी स्वार्थ पाहतात. आणि त्याच जनतेच्या पैश्यातून स्वताची ऐश करून घेतात. बर त्याला काही सीमा हि नाही राहिली.  अब्जोने पैसा स्विस बँकेत पडून आहे कोणाचा किती पैसा हेय सर्वाना माहित असून हि सरकार इतकी हतबल कशी की असू शकते हाच प्रश्न पडतो.

प्रत्येक गोष्टीसाठी पैसा । मग तुम्ही सरकारी किवा गैरसरकारी कोणत्याही खात्यात जा इथे तुम्हाला कोणतेही छोट्यातला छोटे काम का असेना " लाच " हि द्यावीच लागते विना लाच घेतल्या शिवाय काम होणे संभव नाही. साध्या  क्लार्क ते मंत्री संत्र्यांना लाच देवूनच आपली फाईल पुढे सरकली जाते.

बर हेय इथेच थांबत नाही शाळा कॉलेज मध्ये हि लाच असे प्रकार चालूच आहेत. नामवंत शाळेत admission घ्यायचे इथे डोनेशन च्या नावावर पैसे उकळले जातात.

बर इथवर ठीक आहे पण बँका जी प्रत्येक देशाची आधारस्तंभ आहे. तेथे हि भ्रष्टाचार आहेच की. आपण कोणत्या तरी लोन प्रपोझल साठी अर्ज करतो ती फाईल  कोणत्या न कोणत्या कारणाने reject केली जाते. आणि नंतर तिथेले ऑफिसर लाच घेवून ती फाईल मार्गला अशी लावतात.

आता नंबर येतो देशाची सुरक्षा ज्यांचा हातात आहे त्यांचा म्हणजे " पोलिस विभाग " यांच्यावर कुणाचाही कवडी मात्र विश्वास उरला नाहीये. सगळे पोलिस विभाग मंत्र्याचे हाथचे कटपुतली होवून नाचत आहे. " जमुरे नाच म्हणाले कि नाचणार थांब म्हणाले कि थांबणार " त्यामुळे दाभोलकर करांची हत्या होवून महिना उलटून गेला तरी अजून निकाल लागला  नाही.

या सगळ्या कारणांना एकाच गोष्ट मला कारणीभूत आहे असे वाटते ती म्हणजे " भ्रष्टाचार " भारताला जगाच्या अर्थव्यवस्थेत आणि प्रत्येक विभागात उदारणार्थ सरकारी, गैरसरकारी , पोलीसदल आणि अशा इतर अनेक गोष्टीत जगात नंबर एक देश बनायचे असेल तर भ्रष्टाचार रुपी नागाला वेळीच ठेचले पाहिजे. तरच आपला भारत एक महासत्ता देश म्हणून उभारू शकेल.

त्यासाठी आपण सामान्य नागरिकांनी प्रयन्त केले पाहिजे. सगळ्यात पहिले प्रत्येकाने मनोबल वाढवले पाहिजे. तसेच प्रत्येक व्यक्तीने आपल्याला दिलेले काम प्रामाणिकपणे पार पडले पहिजे. मग ती व्यक्ती सरकारी , गैरसरकारी किवा कोणताही विभागातील काम असेना ते प्रामाणिकपणे कोणत्याही स्वरुपाची लाच न घेता करावी.

तसेच शिक्षण क्षेत्रात पण या बाबत नवीन पायंडे पडले पाहिजेत. जेणे करून आपली नवीन पिढी आपल्या जुन्या प्राचीन संस्कृती तसेच नैतिक प्रमानांचे  संस्कार शिकून घेवून त्या  स्वरुपात विकसित झाली पाहिजे.

तसेच न्यायव्यवस्था पण कठोर करण्यात आली पाहिजे आणि याच आधारे आपल्याला पुढे जावे लागेल तेव्हाच या भ्रष्ट्राचारावर आपण काही अंश तरी लगाम घालू शकू…