Thursday 20 June 2013

ती माझी....लाडकी मैत्रिण होती.

सुप्रभात मित्रहो,

तशी ती स्वभावाने अबोलच,स्व:तामध्ये रमणारी,सांगण्या सारखं खुप असायचं तिच्याकडे, पण डोळ्यातुनच बोलणारी.मी अगदीच विरुद्ध,सतत बडबड करायचो,तू अगदी "टू मच" आहेस हे ऐंके पर्यंत पिडायचो.तसेही तिला पिडल्या शिवाय मला तरी कुठे चैन पडायची.मग तिला हसवण्यासाठीच माझी मिमिक्री असायची.कारण ती माझी....... लाडकी मैत्रिण होती.

तिला काही हवं असल की अगदी हक्काने मागायची..काय काय शोधुन हवे याची एक मोठी यादीच मिळायची.....कधी एखादे गाणे तर त्यात कधी कविता असायची...थोडा जरी शोधायला उशीर झाला की मात्र लगेच रुसायची...ती होती गाण्यांची दिवानी..तिला आवडायची...सगळी सुंदर गाणी....मी देखील मग फक्त तिच्या साठी सगळी शोधाशोध करायचो....मला नव्हती गाण्यांची आवड....तरी तिच्या साठी फक्त ऐंकायचो...कधी मित्रा कडून मिळव..तरी कधी दुकानात जावून तिच्यासाठी सिडिस घ्यायचो...मग ती जेव्हा गोड हसुन "थॅक्स" म्हणायची, तेव्हा ती खुपच छान वाटायची...

तसा मी खुप समजुतदार,पण तिच्यासमोर वेंधळ्यासारखा वागायचो..सांगायचे काही वेगळेच असायचे,पण काही वेगळेच बोलायचो....मग मात्र ती खुप खुप चिडायची..तू काय मुर्ख आहेस का?असे सुद्धा म्हणायची.तिच्या नाकावर कधी कधी खुप राग असायचा,कधी शब्दातून नाही दिसला तरी,तो तिच्या अबोल्यातून कळायचा.अश्या वेळी ती खुप खुप गप्प असायची,मी एकटाच "हाय" करायचो तरीही नाही बोलायची.मी मात्र सगळ काही हसण्या वरती न्यायचो...तिच्या समोर जरी वेधळा असलो तरी, तेव्हा मात्र समजुतदार व्हायचो.तिलाच माझी नंतर थोडी थोडी दया यायची,मग ती हळूच हसायची....तिची कळी खुललेली पाहून,माझी मुद्रा ही खुलायची...

एक दिवस का कुणास ठाऊक कसे आक्रीत घडले...नियतिच्या मनात काही वेगळेच असते, हे त्या दिवशी कळले.सांगायचे होते काय? आणि प्रकरण भलतीकडे वळले.....माझ्या ही डोक्यात त्या दिवशी भरपुर राग गेला...शस्त्रांनी जितक्या जखमा केल्या नसतील..तितक्या दोघानाही शब्दानी झाल्या.देवाला ठाऊक असेल फक्त,कोणी कोणाला हर्ट केले,पण एक मात्र नक्की, तिचेमाझे भांडण झाले.मैत्री पेक्षा तिचे माझे इगो मोठे झाले,शेवटी एकमेकाशी न बोलायचे ठरले अन दोघांचे जीव शांत झाले.मी मात्र आज ही तिला खुप मिस करतो,आता ती कशी असेल,याचा सुद्धा विचार करतो. तिच्या काळजीने आज ही जीव तितकाच जळतो.कधी कधी तिच्याशी खुप बोलावेसे वाटते,आज काय घडले ते सगळे सांगावेसे वाटते.विचार येतो मनात,"ती तुला विसरली सुद्धा असेल,तू कोण हे देखील तिला आठवत नसेल."......फोन पर्यन्त हात जातो,पण मी रिसिव्हर खाली ठेवतो...आज नाही पण उद्या नक्किच बोलू असे मनात म्हणतो...कारण ती माझी....लाडकी मैत्रिण होती.

आजकाल कोणाशी मैत्री करायची देखील भिती वाटते.कारण ज्याना आपण आपले मानतो,तिच व्यक्ती शेवटी तोडून जाते...तोडने किती सोप्पे असते,पण जाणाऱ्यांना त्याची काही किंमत नसते.ते हरवून जातात या विश्वाच्या पसाऱ्यात....ठेवून जातात मना मध्ये आठवणींचे मोरपंख,दुखऱ्या जागाना ह्ळुवारपणे स्पर्श होवून,जखमा अधिक सुगंधी करण्यासाठी.....मी आजही वाट पाहतोय तिच्या परत येण्याची,ती अशीच विश्वाच्या पसाऱ्यात हरवली आहे,की तिच्या कोशात ते तिला माहित...पण खात्री आहे एक ना एक दिवस ती नक्की परत येईल...पुन्हा भांडण करण्यासाठी.मीही तिची आतुततेने वाट पाहतो आहे,तिला पुन्हा पिडण्यासाठी......कारण ती माझी........

Monday 10 June 2013

Prem


प्रिय ....

काही गोष्टी अशा असतात, की त्या समोराच्याला सांगायच्या असूनही आपण सांगू शकत नाही. मी माझं प्रेम व्यक्त करायला हवं होतं की नाही, हा प्रश्न मला आजही पडतो. तुझं ते येणं, हसणं, माझ्याशी बोलताना घाबरणं, कधीकधी गोंधळणं अजूनही मला सर्व काही आठवतं. तू आल्यावर मला काही सुचायचंच नाही. फक्त तुझ्याकडे बघत राहावं, असं वाटायचं. तू गेल्यावर मैत्रिणीबरोबर मी तुझ्यावर शेरेबाजी करायचो. माझ्या प्रेमाचं गुपित मी मनातच ठेवलं. म्हणतात ना, 'काही नाती असतात अबोलपणे बोलण्याची, मनातल्या मनात जोडून मनातच तोडण्याची...' मला अजूनही तुझी पहिली भेट आणि बाकीच्या आठवणी लक्षात आहेत. त्या कधीच विसरू शकणार नाही. ज्या गोष्टी आपण विसरत नाही, त्यालाच तर आठवणी म्हणतात. नंतर मी स्वत:मध्येच हरवू लागलो. नेहमी तुझाच विचार करायचो. तुझ्या वागण्यातून मला एक प्रकारचा संकेत मिळायचा. पण वाटायचं, की हा माझा भास तर नाही ना? आपण एकमेकांशी मैत्रीसुद्धा केली नाही.  आपण दोघं एकमेकांच्या समोर असल्यावर एवढं गोंधळायचो, की काय बोलायचं हे सुचायचंच नाही. मी तुला जितकं विसरायचा प्रयत्न करतो, तितकाच तू मला आठवत राहतेस. जेव्हा मला खूप मनापासून वाटत असतं, की तू दिसावास तेव्हा प्रत्यक्षात तू दिसत नाहीस. पण माझ्या ध्यानीमनी नसतानाही अचानक तू मला दिसतेस. असं का होतं? तुला पाहिलं, की माझे डोळे लगेच भरून येतात. आनंदाने की दु:खाने, हे माझं मला समजत नाही. जेव्हा मला तुझी गरज होती, तेव्हा तू माझ्यापासून खूप दूर होतीस. आजही मला तू हवी आहेस. पण तू माझ्या जवळ नाहीस. मला फक्त एकदाच तुला सांगायचं आहे, की मी तुझ्यावर खूप भरपूर, सॉल्लिड... माझ्याकडे शब्दच नाहीत, पण खरंच प्रेम करतो…

तुझाच 

Sunday 9 June 2013

Geography & Love


खूप वर्षापूर्वी एका मैत्रिणी ने Geography आणि Love या विषयावर लिहायच Challenge दिलं होत. मग मी पण डोक चालवलं आणि एक फ़ुल्ल
टाईमपास Passage 'फेकला'… आज ड्राफ्ट मध्ये सापडला … शेअर करतोय .. hehehe ,Enjoy.

जगातील मोठ्या नद्यांपैकी एक अशी नाइल नदी ही भूमध्य समुद्रासारख्या छोट्या समुद्राला जाउन मिळते .कदाचित 'नाइल' चा प्रियकर 'भूमध्य समुद्र' असेल...

प्रेम 'सोय' बघत नाही...म्हणूनच ती नदी इतक्य दूर प्रियकराला भेटायला जात असावी ..
म्हणूनच कदाचित अटलांटिक आणि हिंदी महासगारांचा भव्यदिव्यपणा,आणि रुबाब तिला भुरळ घालत नसावा..
केवळ प्रेम असल्यामुळेच अटलांटिक किंवा हिंद महासागरासारखे भव्य दिव्य पर्याय उपलब्ध असताना देखील भूमध्य सारख्या तुलनेने छोट्या समुद्राकडे ती आकर्षित झाली असावी...
म्हणून केवळ जवळ असणे किंवा सोय पहाणे ही प्रेमाची लक्षणे नाहीत .... खर्या प्रेमाला भौगोलिक बंधने असू शकत नाहीत...
आणि प्रेम हे 'भव्यते' वर ठरत नाही...
प्रेमासाठी महासागरा प्रमाणे तुमच्या कड़े खुप सम्पत्ती ,मानमरातब ,प्रतिष्ठा असण्याची गरज नाही...
गरज आहे ती ...प्रचंड ओढीची.. …. हेच तर 'नाइल' ला सांगायचे नसेल....?

Saturday 8 June 2013

स्वच्छंदी जगा मित्रहो !!!

एखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला. दुकानात असलेल्या कपड्यांच्या गर्दीत तो साधा वाटतो, पण तरीही आवडतो. काहीतरी दुसरे घेऊन बाहेर पडतो आपण. परतताना मनात विचार येतो ‘तो ड्रेस घ्यायला हवा होता!’

सिग्नलला गाडी थांबते. चिमुरडी काच ठोठावते. गोड हसते, पण भिक मागत आहे हे लक्षात घेऊन त्या हसण्याकडे फार लक्ष देत नाही आपण. २-३ रुपये द्यावे असे मनात येते. रेंगाळत सुटे शोधता शोधता ‘देऊ का नको’ हा धावा मनात सुरू असतो. तेवढ्यात सिग्नल सुटतो. गाडी पुढे घ्यायची वेळ येते. थोडे पुढे गेल्यावर मन म्हणते, ‘सुटे होते समोर, द्यायला हवे होते त्या चिमुरडीला!’

जेवणाच्या सुट्टीत ऑफिसातला मित्र त्याच्या घरातला त्रास फार विश्‍वासाने सांगतो. त्याच्या डोळ्यात व्यथांचे ढग दाटलेले दिसतात. वाईट वाटते खूप. नशीब आपण त्या परिस्थितीत नाही असेही मनोमनी पुटपुटून आपण मोकळे होतो. ‘काही मदत हवी का?’ असे विचारायचे असूनही आपण गप्प राहतो. जेवणाची सुट्टी संपते. तो त्याच्या आणि आपण आपल्या कामाला लागतो. क्षणभर स्वत:वर राग येतो, ‘मदत तर विचारली नाही, निदान खांद्यावर सहानुभूतीचा हात तरी ठेवायला हवा होता मी!’

असेच होते नेहमी. छोट्या छोट्या गोष्टी राहून जातात. खरं तर या छोट्या गोष्टीच जगण्याचे कारण असतात. गेलेले क्षण परत येत नाहीत. राहतो तो ‘खेद’, करता येण्यासारख्या गोष्टी न केल्याचा...

जगण्याची साधने जमवताना जगणेच राहून जात नाहीयेना ते ‘चेक’ करा.

आनंद झाला तर हसा, वाईट वाटले तर डोळ्यांना बांध घालू नका. चांगल्या गोष्टीची दाद द्या आवडले नाही तर सांगा, घुसमटू नका. त्या त्या क्षणी जे योग्य वाटते ते करा. नंतर त्यावर विचार करून काहीच साध्य नाही.

आयुष्यातल्या छोट्या गोष्टींना महत्त्व द्या. त्या छोट्या क्षणांना जीवनाच्या धाग्यात गुंफणे म्हणजेच जगणे.

आवडलेल्या गाण्यावर मान नाही डुलली तर ‘लाईफ’ कसले! आपल्यांच्या दु:खात डोळे नाही भरले तर लाईफ कसले! मित्रांच्या फालतू विनोदांवर पोट दुखेस्तोवर हसलो नाही तर कसले लाईफ! आनंदात आनंद आणि दु:खात दु:ख नाही जाणवले तर लाईफ कसले..!